Friday, November 22, 2024
Homeक्रीडामुंबई-विदर्भ महामुकाबला ड्रॉ झाल्यास विजेता कोण?

मुंबई-विदर्भ महामुकाबला ड्रॉ झाल्यास विजेता कोण?

रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विजयी आव्हानाचं पाठलाग करतना विदर्भाने चौथ्या दिवशी जोरदार झुंज दिली. तर पाचव्या दिवसाचीही कमाल सुरुवात केलीय.मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी फायनलचा महामुकाबला खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा पाचवा दिवस आहे. मुंबईने विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं आव्हान दिलं. विदर्भाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 92 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 248 धावा केल्या.

त्यामुळे विदर्भाला पाचव्या दिवशी आज 14 मार्च रोजी विजयासाठी आणखी 290 धावा कराव्या लागणार आहेत. तर मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी 5 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल लागणार हे निश्चित आहे.कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्तवात मुंबई रणजी ट्रॉफीचं 42 वं विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहे. जर हा सामना ड्रॉ झाल्यास मुंबई टीम रणजी ट्रॉफी विनर ठरेल. रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या नियमांनुसार, सामना ड्रॉ राहिल्यास पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या संघाला विजेता घोषित केलं जातं. मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. तर विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 105 धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईला 119 धावांची निर्णायक आघाडी मिळाली. मुंबईने या आघाडीच्या मदतीने दुसऱ्या डावात 418 धावांपर्यंत मजल मारली.

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कधीच 380 प्लस धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आलेला नाही. मात्र 350 रन्स 5 वेळा चेसिंग केल्या आहेत. तर विजयी लक्ष्याचं पाठलाग करताना 3 वेळा 370 धावांचा टप्पा ओलांडला गेला आहे. रेल्वे टीमने याच हंगामात हा कारनामा केला. तर याआधी सौराष्ट्र, राजस्थान, आसाम आणि उत्तर प्रदेशने असा कारनामा केला आहे.दरम्यान विदर्भाने 538 धावांचा यशस्वी पाठलाग केल्यास ते इतिहास रचतील. रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक रन चेसिंगचा रेकॉर्ड रेल्वेच्या नावावर आहे. रेल्वेने या हंगामात त्रिपुरा विरुद्ध 378 धावांचा यशस्वी पाठलाग केला. तर त्याआधी सौराष्ट्रने 2019-2020 मध्ये 372 धावा चेस केल्या होत्या. आता विदर्भ इतिहास रचणार की मुंबई 42 वेळेस बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.

विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -