आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. सलामीच्या सामन्यात सीएसके विरुद्ध आरसीबी आमनेसामने असणार आहेत. त्याआधी एका टीमने दिग्गजाला हटवलं आहे.
आयपीएलच्या 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी पंजाब किंग्सने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सने टीममधून दिग्गजाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.टीम इंडियाचा माजी दिग्गज वसीम जाफर पंजाब किंग्सपासून वेगळा झालाय. वसीम जाफर पंजाब किंग्सचा बॅटिंग कंसल्टंट होता.वसीम जाफर रणजी ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
जाफरने रणजी ट्रॉफीत 57 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 10 शतकं ठोकली आहेत.जाफर बाहेर पडल्यानंतर आता टीम डायरेक्टरच्या भूमिकेत असलेले संजय बांगर हेच बॅटिंग कोच म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. बांगर यांनी याआधी आयपीएलमध्ये आरसीबीच्या बॅटिंग कोचची जबाबदारी सांभाळलीय. तसेच बांगर हे टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक ही राहिले आहेत.दरम्यान पंजाब किंग्सची गत 16 व्या मोसमातील कामगिरी काही खास नव्हती. पंजाबला चांगल्या सुरुवातीनंतरही 14 पैकी फक्त 6 सामनेच जिंकता आले.