आमचं ठरलंय म्हणत विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. मोहितेंचं ठरलंय यंदा भाजपविरोधात तुतारी फुंकणार? माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांचं ठरलं असल्याचे बोलले जात आहे. मोहिते पाटील यांचे बंधू बाळदादांचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल होतोय. भाजपने स्थानिक विरोधाला डावलून पुन्हा रणजित नाईक निंबाळकरांना तिकीट दिल्याने, आमचं ठरलंय म्हणत असा बाळदादांचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
माढा लोकसभेत भाजपने पुन्हा एकदा रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिलंय. त्यामुळे इच्छुक धैर्यशील मोहिते यांचे समर्थक नाराज झालेत. माढा लोकसभेत महायुतीत खोडा होण्याची दाट शक्यता आहे. माढ्यात मोहितेंचं ठरलंय? कुणाचं गणित बिघडलंय? बघा स्पेशल रिपोर्ट…