Friday, November 22, 2024
Homeक्रीडादिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवने अशी केली तयारी

दिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवने अशी केली तयारी

आयपीएल स्पर्धेत काहीही करून मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळवावा लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना वानखेडेवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील चौथा सामना आहे. त्यामुळे मुंबईचं प्लेऑफचं गणित चौथ्या सामन्यापासून नवव्या सामन्यापर्यंत काय ते ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय खूपच महत्त्वाचा आहे. 11 सामने उरले असले तरी जर तरची लढाई पाहता मुंबईला 10 सामने जिंकावेच लागणार आहेत.

नाही तर प्लेऑफमधील स्थान डळमळीत होईल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज आहे. आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे चौथ्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळणार आहे. मागच्या तीन सामन्यात दुखापतीमुळे एनसीएने त्याला हिरवा कंदील दिला नव्हता. पण आता चिंता दूर झाली असून सूर्याने जोरदार प्रॅक्टिस सुरु केली आहे.सूर्यकुमार यादवने वानखेडे स्टेडियमवर जोरदार प्रॅक्टिस सुरु केली आहे. रोहित शर्मा आणि बॅटिंग कोच किरोन पोलार्ड यांनी सूर्यकुमार यादवचं स्वागत केलं. सूर्यकुमार यादव आल्याने मुंबई इंडियन्स संघाला बूस्टर मिळणार आहे. मुंबई इंडियन्सला विजयाचा मार्ग सापडेल का हे स्पष्ट होईलच.

तत्पूर्वी सूर्यकुमार यादवने दिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी प्रॅक्टिस केली. यावेळी सूर्यकुमार यादवने सुपला शॉट्सचा सराव केला. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात हा शॉट पाहायला मिळू शकतो.गेल्या वर्षी झालेल्या घोट्याच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव अफगाणिस्तान विरुद्ध खेळला नव्हता. त्यानंतर आता सूर्यकुमारचे पुनरागमन झाले आहे. मागच्या पर्वात 16 सामन्यात सूर्यकुमार याादवने 43.21 च्या सरासरीने 605 धावा केल्या होत्या. यात त्याचा 181 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट होता. आयपीएल कारकिर्दीत 139 सामन्यांमध्ये 32.17 च्या सरासरीने 3,249 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये एक शतक आणि 21 अर्धशतकं झळकावली आहेत. यात नाबाद 103 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

 

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -