Thursday, November 21, 2024
Homeसांगलीसांगलीवरून खडाजंगी, संजय राऊत यांनी दमच भरला; म्हणाले, तर तुमची महाराष्ट्रात कोंडी…

सांगलीवरून खडाजंगी, संजय राऊत यांनी दमच भरला; म्हणाले, तर तुमची महाराष्ट्रात कोंडी…

उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ही काळ्या दगडावरची शाई आहे. त्यामुळे तुम्ही आलात तर तुमच्या सोबत, नाही आला तर तुमच्याशिवाय आम्ही ही निवडणूक लढवून दाखवू, असं सांगतानाच सांगलीत कोंडी केली तर तुमची महाराष्ट्रात कोंडी करू, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाला हा इशारा दिला आहे. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडी दुभंगल्याचं स्पष्ट झालं आहे.

खासदार संजय राऊत हे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचे चांगलेच कान उपटले. सांगलीतील आमदारकी, खासदारकी आमच्याकडे राहिली पाहिजे, विशिष्ट घराण्यात राहिली पाहिजे. ज्यांच्या हातात बँका, कारखाने, शैक्षिणक संस्था आहेत अशांच्या हाती राहिली पाहिजे, असा काही लोकांचा अट्टाहास आहे. सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला संसद आणि विधानसभेत जाण्याचे दरवाजे बंद करायचे आणि त्यांनी गुलाम म्हणून राहायचे यासाठी लोकशाही देशात आली नाही. सामान्य माणूस पालिकेपासून संसदेत गेला पाहिजे. तो मंत्री, मुख्यमंत्री झाला पाहिजे अन् पंतप्रधान झाला पाहिजे यासाठी लोकशाही आहे, असं संजय राऊत यांनी आघाडीच्या नेत्यांना सुनावलं.

 

मग आम्ही थांबणार नाही

जोपर्यंत घराणे आहेत, घराण्यात सत्ता आहे, म्हणून लोकशाही का? या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने केलं आहे. शिवसेनेने सामान्य माणसाला सत्तेत बसवलं. आधी चंद्रहार समोर आला. मग आम्ही ठरवलं सांगितलं सांगली लढायची. आधी लोकसभा सीट घेतली आणि नंतर चंद्रहारला बोलावलं असं नाही. त्यामुळे चंद्रहारच्या उमेदवारीला पाठिंबा दिला पाहिजे. आज कोणी वेगळ्या मार्गाने राजकारण करून सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल तर ही कोंडी फोडण्याची ताकद शिवसेनेत आहे. मग आम्ही थांबणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात कोंडी होईल, असा दमच राऊत यांनी भरला.भाजपला मदत करायचीय

ज्यांना अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करायची आहे, ज्यांना काही करून भाजपचा खासदार निवडून आणायचा आहे, त्यासाठी हे प्रकार सुरू आहे. पण सांगलीत जोपर्यंत चंद्रहार आहेत, तोपर्यंत भाजपचा खासदार निवडून येणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

 

चंद्रहार यांचा मान वाढवा

चंद्रहार पाटीलला उमेदवारी जाहिर केली तेव्हा अनेकांच्या पायाखालच्या सतरंज्या सरकल्या. त्यांच्याकडे साखर कारखाना नाही, सुतगिरण्या नाहीत. आज विशीष्ट लोक चंद्रहार पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. पण सांगलीतील 99 टक्के जनतेला शिवसेनेची भूमिका पटली आहे. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आहेत. त्यांचा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -