Thursday, February 6, 2025
Homeराजकीय घडामोडीलोकसभा निवडणुकीत हे शेअर ठरतील भाग्यविधाते; कमाईचा मौका सोडू नका

लोकसभा निवडणुकीत हे शेअर ठरतील भाग्यविधाते; कमाईचा मौका सोडू नका

 

लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होईल. तर 4 जून रोजी मतदान मोजणी होईल. इनटेलसेन्स कॅपिटलचे संस्थापक आणि मुख्य इक्विटी सल्लागार अभिषेक वासू मलिक यांनी या काळात स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर गगनाला पोहचतील, असा अंदाज वर्तवला आहे. मलिक यांच्यानुसार, रसायन आणि विमा क्षेत्रात (Chemical & Insurance) रॅली येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेअर बाजारात हे स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.केमिकल-इन्शुरन्स सेक्टर ठरणार उजवे

मलिक यांच्या दाव्यानुसार, पुढील 12 महिन्यात रसायन आणि विमा क्षेत्रातील शेअर्सला अच्छे दिन येतील. हे शेअर सूसाट धावतील. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जोरदार तेजीचे सत्र असेल. पण त्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक कायम ठेवावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कालावधीत स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअरमध्ये पुन्हा एकदा उसळी येण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. निवडणुकीच्या काळात या क्षेत्रातील शेअर नवीन रेकॉर्ड करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मिड कॅप शेअरमधून कमाई

मलिक यांच्या दाव्यानुसार, निवडणूक पूर्व प्रचार काळात स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर पुन्हा शानदार कामगिरी दाखवतील. ते नवीन उच्चांक गाठतील. येत्या काही महिन्यात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमधून गुंतवणूकदारांना चांगली कमाई होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी सध्या निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याचा त्यांचा अंदाज आहे.

PSU Sector साठी ही रणनीती

अभिषेक बसू मलिक यांच्या म्हणण्यानुसार, पीएसयु शेअरला, सार्वजनिक उपक्रमातील शेअरला वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज नाही. या क्षेत्रातील कंपन्या, त्यांचे कामकाज आणि नफा याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे. या क्षेत्रातील प्रत्येक कंपनी जोरदार आहे. प्रत्यके कंपनीची उत्पादन, कामकाज, नफा हे विषय वेगळे आहेत. रेल्वे कंपन्या आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे कामकाज, नफा हे वेगळे विषय आहेत. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करताना सेक्टर आधारे निवड करणे आणि गुंतवणूक करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -