विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. येथील सोडगे मळा परिसरात पाणी भरत असताना विद्युत मोटार बंद करताना वीजेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू झाला. बेबीजान साहेबलाल नदाफ (वय ३९) असे मृत महिलेचे नांव आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर रोडवरील डॉ. लांडे हॉस्पिटलच्या मागे बेबीजान नदाफ या कुटुंबासमवेत राहण्यास आहेत. शनिवारी सकाळी नळाला पाणी आल्याने त्या पाणी भरत होत्या.
पाण्यासाठी त्यांनी विद्युत मोटार जोडली होती.