पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान(political articles) बनल्यानंतर, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने 2014 मध्ये कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांची जाहीर सभा कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर झाली होती. आता याच मैदानावर ते शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत आहेत. महायुतीच्या वतीने त्यांच्या स्वागताची तसेच सभेची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. पोलीस प्रशासनाने ही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा(political articles) मतदारसंघ या ठिकाणी महायुतीचे अर्थात शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे निवडणूक लढवत आहेत. हे दोघेही लोकसभेच्या 17 व्या मावळत्या सभागृहाचे सदस्य आहेत. महायुतीचा धर्म म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येथे प्रचार सभा घेणार आहेत.
2014 मध्ये पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर ही सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबद्दल निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. जिल्ह्याला तीर्थक्षेत्राचा जिल्हा म्हणून दर्जा देणार अशा आशयाचे ते आश्वासन होते. तथापि नंतर महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा मंजूर केला. प्रत्यक्षात तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला गेला नाही.
2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने, नरेंद्र मोदी हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते मात्र तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. कोल्हापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा देसाई यांच्या चिरंजीवांच्या विवाह समारंभास ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांची सासणे विद्यालय मैदानावर जाहीर सभा झाली. या निवडणुकीत त्यांनी महागाईचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. महाराष्ट्रात लोड शेडिंग आणि गुजरात मध्ये 24 तास वीज याची तुलना केली होती. जनतेवर प्रचंड महागाई लादणाऱ्या, काँग्रेस विरोधी तुम्ही भूमिका घेतली नाही तर पुन्हा सत्तेवर येणाऱ्या काँग्रेसकडून पुन्हा महागाई लादली जाईल. आणि मग महागाई सहन करण्याची तुम्हाला सवयच लागेल असे वक्तव्य त्यांनी सासणे मैदानावर बोलताना केले होते.
2014 नंतर महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचे सरकार नाही आणि केंद्रातही काँग्रेसचे सरकार नाही. पण महागाईचा प्रश्न जैसे थे आहे.
आपण एका वृत्तपत्राच्या औद्योगिक वसाहती मधील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी हे आले होते. नरेंद्र मोदी हे जेव्हा जेव्हा कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा तेव्हा ते करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येतील असे तथापि त्यांची अपेक्षा फोल ठरली. नरेंद्र मोदी हे अध्यात्मवादी आहेत. काही महिन्यापूर्वी ते पुण्यात आले होते आणि तेथे त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली होती. शनिवारी ते कोल्हापूरला येणार आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी ते वेळ काढणार का अशी चर्चा कोल्हापुरात सुरू झाली आहे.
कोल्हापुरात तयार होणाऱ्या गुळाला सर्वात मोठी बाजारपेठ गुजरात आहे. त्याचा संदर्भ देऊन कोल्हापूरचे गुजरातशी असे गोड संबंध आहेत हे सांगायला तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे विसरले नाहीत. कोल्हापुरात होणाऱ्या जाहीर प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांच्याकडून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासाठी” गोड ‘ आश्वासनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाच, अर्थात महापालिकेचा सुदैव असे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इतर मोठ्या शहरात प्रचाराच्या निमित्ताने जसा “रोड शो “झाला, तसा तो कोल्हापुरात होत नाही. तसा तो झाला असता तर युद्ध पातळीवर किमान काही प्रमुख रस्त्यांना डांबर लागले असते. कोल्हापूरच्या लोकांची अशी अपेक्षा आहे की पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांनी “रोड शो” करावा.