Monday, December 23, 2024
Homeक्रीडाभुवनेश्वर कुमारने मॅच फिरवली, हैदराबादचा राजस्थानवर शेवटच्या बॉलवर 1 रनने थरारक विजय

भुवनेश्वर कुमारने मॅच फिरवली, हैदराबादचा राजस्थानवर शेवटच्या बॉलवर 1 रनने थरारक विजय

सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध शेवटच्या बॉलवर 1 रनने थरारक विजय मिळवला आहे. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. तेव्हा हैदराबादचा बॉलर भुवनेश्वर कुमारने अचूक बॉल टाकत रोवमॅन पॉवेल याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. हैदराबादने अशाप्रकारे 1 रनने सनसनाटी विजय मिळवला. हैदराबादने या विजयासह राजस्थानचा विजयरथ रोखला. राजस्थानचा हा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील चेस करताना पहिला पराभव ठरला. हैदराबादने राजस्थानला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 200 धावाच करता आल्या.

भुवनेश्वरकडून 13 धावांचा यशस्वी बचाव

राजस्थानला विजयासाठी 20 व्या ओव्हरमध्ये 13 धावांची आवश्यकता होती. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने ही 20 वी ओव्हर टाकली. राजस्थानकडून रोवमॅन पॉवेल आणि आर अश्विन ही जोडी मैदानात होती. रोवमॅनने जवळपास मॅच जिंकवलीच होती, मात्र भुवीने अप्रतिम बॉलिंग करत हैदराबादला विजय मिळवून दिला. भुवनेश्वरने अखेरच्या ओव्हरमध्ये 13 धावांचा यशस्वी बचाव केला.

 

राजस्थानकडून चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. जॉस बटलर आणि कॅप्टन संजू सॅमसन या दोघांनी घोर निराशा केली. दोघेही खातंही उघडू शकले नाहीत. राजस्थानसाठी रियान पराग याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल याने 67 धावांचं योगदान दिलं. शिमरॉन हेटमायर याने 13 धावा जोडल्या. ध्रुव जुरेल 1 रन करुन माघारी परतला. तर रोवमॅन पॉवेल याने अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र त्याला राजस्थानला विजयी करता आलं नाही. रोवमनॅनने 27 धावा केल्या. तर आर अश्विन 2 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन पॅट कमिन्स आणि टी नटराजन या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.

हैदराबादची बॅटिंग

दरम्यान त्याआधी हैदराबादने टॉस जिंकला. कॅप्टन पॅट कमिन्स याने बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड याने 44 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा याने 12 आणि अनमोलप्रीत सिंह याने 5 धावा केल्या. तर त्यानंतर नितीश रेड्डी आणि हेन्रिक क्लासेन या जोडीने हैदराबादला 200 पार पोहचवलं. नितीशने हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. नितीशने 42 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 76 रन्स केल्या. तर हेन्रिक क्लासेनने 19 चेंडूत नाबाद 42 धावा जोडल्या. राजस्थानकडून आवेश खान याने 2 विकेट्स घेतल्या. तर संदीप शर्मा याने 1 विकेट घेतली.

 

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि संदीप शर्मा.

 

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -