Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीमुसळे विद्या मंदिरात नवागताचे स्वागत उत्साहात : पाठ्यपुस्तकाचे वितरण

मुसळे विद्या मंदिरात नवागताचे स्वागत उत्साहात : पाठ्यपुस्तकाचे वितरण

ताजी बातमी/ ऑनलाइन टीम

श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेच्या तात्यासाहेब मुसळे बाल विद्यामंदिर इचलकरंजी येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थी यांचे उत्साहात स्वागत व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शनिवार दिनांक 15 जून 2024 हा 2024- 25 या शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस. या दिवशी हा महत्त्वपूर्ण उपक्रम साजरा करण्यात आला.
नवे दप्तर, नवी पुस्तके, नवा गणवेश यासह, विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अतिशय उत्साहात शाळेत आगमन झाले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. काडे मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले व त्यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्याचे स्वागत केले .

शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके वितरण करण्याचा सोहळा, सौ काडे मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .

त्यानंतर शालेय परिसरातून रॅली काढण्यात आली . नवागत विद्यार्थ्यांचे सौ . काडे मॅडम यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले . त्यांनतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले . बालवाडी ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यासाठी खास आकर्षक सेल्फी पाईन्ट करण्यात आला होता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -