ताजी बातमी /ऑनलाइन टीम
राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशाल मनाचे राजे होते. ते बहुजन समाजाचे महानायकही होते. त्यांनी मागासलेल्या तसेच तळागाळातील वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले, असे प्रतिपादन शिरदवाडच्या ग्राम पंचायत सदस्या ज्योती गजानन कांबळे मॅडम यांनी केले.
त्या दत्त्तसाई एज्यूकेशन सोसायटी संचलित युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल अँड अँकॅडमी शिरदवाड येथे राजर्षी छत्रपति शाहु महाराज यांची १५० वी जयंती महोत्सव कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी प्रथम छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात मनोगता मध्ये ज्योती गजानन कांबळे मॅडम यांनी छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. मनोज पाटील सर, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विविध वेशभूषेतील विद्यार्थी उपस्थित होते.