Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगया’ 10 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; IMD ने जारी केला येलो अलर्ट

या’ 10 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; IMD ने जारी केला येलो अलर्ट

गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. परंतु आता आठवडाभराच्या तुलनेत आता कुठे पावसाचा जोर थोडा कमी झालेला दिसत आहे. तरी देखील अनेक भागांमध्ये सध्या मध्यम आणि मुसळधार पावसाने (Weather Update) हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभाग दररोज महाराष्ट्रातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. आज म्हणजेच 28 जुलै 2024 रोजी हवामान (Weather Update) कसे असेल? याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात देखील मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असून, या ठिकाणी आता नागरिकांना पावसाचा (Weather Update) ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

 

त्याचप्रमाणे पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. आज मुंबईत देखील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या चार दिवसात मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे मुंबईतील पावसाला देखील हवामान विभागाने गेलो अलर्ट दिलेला आहे.

 

 

पुण्यातील घाट परिसरात त्याचप्रमाणे इतर भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. विदर्भातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये आज पावसाचा (Weather Update) अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पावसासोबत या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा येण्याची देखील शक्यता आहे. तरीदेखील उद्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार, असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -