Wednesday, March 12, 2025
Homeक्रीडाअजिंक्य रहाणेची 70 धावांची तडाखेदार खेळी, टीम उपांत्य फेरीत

अजिंक्य रहाणेची 70 धावांची तडाखेदार खेळी, टीम उपांत्य फेरीत

मुंबईकर फलंदाज अंजिक्य रहाणे गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. रहाणे टीम इंडियात कमबॅकसाठी प्रयत्न करतोय. रहाणेचं बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून संघात कमबॅक होणार का? याकडे साऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. मात्र त्याआधी होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही रहाणेला संधी देण्यात आलेली नाही. मात्र रहाणेने इंग्लंडमध्ये तडाखेदार बॅटिंग केली आहे. रहाणेने 70 धावांची शानदार खेळी करत लीसेस्टरशर टीमला मेट्रो वनडे कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पोहचवण्यात निर्णायक खेळी केली.

 

मेट्रो वनडे कप स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात लीसेस्टरशर विरुद्ध हॅम्पशर आमनेसामने होते. हॅम्पशरचा कॅप्टन निक गबिन्स याने केलेल्या 136 धावांच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 290 धावा केल्या. त्यामुळे लीसेस्टरशरला विजयासाठी 291 धावांचं आव्हान मिळालं. लीसेस्टरशरने हे आव्हान 49.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

 

लीसेस्टरशरकडून अजिंक्य रहाणे, पीटर हँड्सकॉम्ब आणि लियाम ट्रेवास्किस या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. लियाम ट्रेवास्किस-पीटर हँड्सकॉम्ब या दोघांनी 74 आणि 60 अशा धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 86 बॉलमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 70 धावांचं योगदान दिलं. तर बेन कॉक्सने 45 धावा केल्या. तर हॅम्पशायरसाठी जॉन टर्नर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दरम्यान आता रविवारी 18 ऑगस्ट रोजी उपांत्य फेरीत लीसेस्टरशरसमोर समरसेटचं आव्हान असणार आहे.

 

अजिंक्य रहाणे चौथं अर्धशतक

 

लीसेस्टरशायर प्लेइंग इलेव्हन : लुईस हिल (कर्णधार), सोलोमन बुडिंगर, अजिंक्य रहाणे, पीटर हँड्सकॉम्ब, लुईस किम्बर, बेन कॉक्स (विकेटकीपर), लियाम ट्रेवास्किस, टॉम स्क्रिव्हन, रोमन वॉकर, ख्रिस राइट आणि ॲलेक्स ग्रीन.

 

हॅम्पशायर प्लेइंग इलेव्हन : निक गुबिन्स (कर्णधार), फ्लेचा मिडलटन, टॉम प्रेस्ट, बेन ब्राउन (विकेटकीपर), लियाम डॉसन, टोबी अल्बर्ट, फेलिक्स ऑर्गन, डॉमिनिक केली, काइल ॲबॉट, ब्रॅड व्हील आणि जॉन टर्नर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -