धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती इचलकरंजी अध्यक्ष
श्री महाजन गुरुजी व कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रविंद्र माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी शहर शिवसेना, व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आज इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त श्री ओमप्रकाश दिवटे साहेब
यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यास लोकप्रिय मुख्यमंत्री ना श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मंजुरी दिली .
इचलकरंजी शहरातील कॉ.के.एल.मलाबादे या मुख्य चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यास शासनास त्वरित प्रस्ताव देऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरात लवकर उभा रहावा याबाबत निवेदन देण्यात आले .
याप्रसंगी इचलकरंजी शिवसेना पदाधिकारी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पदाधिकारी उपस्थितहोते