Thursday, November 21, 2024
Homeमनोरंजनगणेशोत्सवाआधीच बाप-लेक आमने सामने, पिळगावकर कुटुंबात असं काय घडलं?

गणेशोत्सवाआधीच बाप-लेक आमने सामने, पिळगावकर कुटुंबात असं काय घडलं?

मनोरंजन क्षेत्रात एकाच कुटुंबात सगळे कलाकार आहे असं फार कमी वेळा पाहायला मिळतं. मराठी इंडस्ट्रीतील अशीच एक फॅमिली म्हणजे पिळगावकर. सचिन पिळगावर, सुप्रिया पिळगावकर यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

त्यांच्यानंतर त्यांनी मुलगी श्रिया पिळगावकर ही देखील हिंदी मनोरंजनसृष्टी आणि ओटीटी क्षेत्रात नाव कमावतेय. एका कुटुंबात सगळेच कलाकार असले ते कधीतरी आमने सामने येणार हे नक्की. पिळगावकर फॅमिलीतही असंच काहीसं झालं आहे. आई-वडील वर्सेस मुलगी अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

 

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचा बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नवरा माझा नवसाचा 2 चा ट्रेलर 4 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. मुंबईत ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. नवरा माझा नवसाचा 2 च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

( अमिताभ यांच्या मृत्यूपत्रात 50 कोटींचा ‘जलसा’ लेकीच्या नावे, बिग बींच्या उरलेल्या कोणाच्या नावावर? )

 

तर दुसरीकडे सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर हिची ताजा खबर 2 ही वेब सीरिज देखील चर्चेत आहे. श्रियाच्या ताजा खबर 2चा ट्रेलर देखील 4 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. ताजा खबरच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

4 सप्टेंबरचा दिवस पिळगावकर कुटुंबासाठी याच कारणासाठी खास ठरला. एकीकडे नवरा माझा नवसाचा 2 आणि दुसरीकडे ताजा खबर 2 चा ट्रेलर रिलीज झाला. नवरा माझा नवसाचा हा मराठीतील कल्ट सिनेमांपैकी एक आहे. तर ताजा खबर ही ओटीटी विश्वातील सध्याची सर्वाधिक पाहिलेली गेलेली सीरिज आहे. दोन्ही कलाकृतींच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दोन्ही कलाकृतींकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

 

नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा 20 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.

ताजा खबर 2 ही वेब सीरिज 27 सप्टेंबर 2024 ला रिलीज होणार आहे. डिज्ने प्लस हॉटस्टार ही सीरिज पाहायला मिळेल. बाप -लेक एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यापैकी कोण हिट ठरणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -