व्यायाम करीत असताना तिसर्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने चंद्रकांत शिवाजी चोरगे (वय 46) या व्यावसायिकाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला.
याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ , बहीण असा परिवार आहे. चोरगे यांचे येथील माधव टॉकीजजवळ फर्निचरचे दुकान आहे. तेथेच त्यांचे दुसर्या व तिसर्या मजल्यावर घर आहे.
इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ते नियमित व्यायाम करतात. आज सकाळी देखील व्यायामासाठी तिसर्या मजल्यावर गेले. गॅलरीतून त्यांचा तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले.