Thursday, November 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर, सांगलीसाठी खूशखबर; दोन स्वतंत्र 'वंदे भारत' धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

कोल्हापूर, सांगलीसाठी खूशखबर; दोन स्वतंत्र ‘वंदे भारत’ धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

गणेशोत्सवाच्या काळात सांगली व कोल्हापूरकरांसाठीरेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. गेला आठवडाभर अनेक वादविवादांनंतर रेल्वे मंत्रालयाने कोल्हापूर ते पुणे व हुबळी ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दिला असून, १६ सप्टेंबरपासून त्या धावतील.

 

हुबळी ते पुणे व पुणे ते हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वेने अचानक या मार्गात बदल करून याच गाडीला कोल्हापूरचा थांबा दिला होता. मात्र, वळसा घालून प्रवास होणार असल्याने त्यात प्रवासाचा वेळ अडीच ते तीन तासांनी वाढणार असल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी अशा मार्गास विरोध केला. त्यातच सांगलीचा थांबा रद्द केल्यानंतर सांगलीच्या नागरिक जागृती मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मेलद्वारे तक्रार करत काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता.

 

पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाला आदेश दिले. त्यानंतर कोल्हापूर व हुबळीसाठी दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील देण्यात आला. सायंकाळी रेल्वेचे कोचिंग विभागाचे संचालक संजय नीलम यांनी दोन्ही एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर केले.

 

कोणत्या दिवशी धावणार रेल्वे

 

कोल्हापूर ते पुणे वंदे भारत (क्र. २०६७३) ही प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार असून, पुणे ते कोल्हापूर वंदे भारत (क्र. २०६७४) ही प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी धावणार आहे.

हुबळी ते पुणे वंदे भारत (क्र. २०६६९) ही बुधवार, शुक्रवार व रविवारी पहाटे ५ वाजता सुटेल आणि दुपारी १:३० वाजता पुण्यात पोहोचेल तर पुणे ते हुबळी (क्र. २०६७०) ही गुरुवार, शनिवार व सोमवारी दुपारी २:१५ वाजता सुटेल. आणि रात्री १०:४५ वाजता हुबळीत पोहोचेल. या गाडीला धारवाड , बेळगावी, मिरज ,सांगली, सातारा असे पाच थांबे आहेत.

अशी धावणार कोल्हापूर-पुणे वंदे भारत

 

कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून निघेल. मिरजेत ९ वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत ९:४२ ला, कराडला १०:०७, साताऱ्यात १०:४७ तर पुण्यात १:३० वाजता पोहोचेल.

पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणार असून, साताऱ्यात ४:३७, कराडला ५:२५, किर्लोस्करवाडीत ५:५०, सांगलीत ६:१८, मिरजेत ६:४० तर कोल्हापुरात ७:४० ला पोहोचेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -