Thursday, November 21, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : फक्त 20,30,40 रुपयात लुटा फेस्टिवलचा मनमुराद आनंद : अटल महोत्सव

इचलकरंजी : फक्त 20,30,40 रुपयात लुटा फेस्टिवलचा मनमुराद आनंद : अटल महोत्सव

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

 

गणेशोत्सव उत्सव म्हटलं की, वस्त्र नगरीला वेध लागतात ते फेस्टिवलचे. ज्याकडे घरातील बाल चमुसह सर्वांचाच कल असतो. मात्र आतापर्यंत प्रत्येकालाच या फेस्टिवलचा आनंद लुटता येत नव्हता. याबाबत अगदी सर्वसामान्यातील सामान्यांचा विचार करून गतवर्षीपासून वस्त्र नगरीत अटल महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. या महोत्सवात अगदी कोणालाही सहज लाभ घेता येईल या पद्धतीने सर्वच्या सर्व अगदी नाममात्र दरात म्हणजेच 20,30,40 रुपयात सर्वकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

गतवर्षी म्हणजेच गणेशोत्सव सन 2023 – 24 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आणि श्री. शुभम बरगे यांच्या नेतृत्वात सामान्य नागरिकांसाठी नामदेव मैदान येथे अटल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील खेळणी आणि पाळने यांचे दर केवळ 20, 30, 40, 50 रुपयांच्या मध्यम वर्गासाठी परवडतील अशा किमतीत ठेवण्यात आले होते, ज्याचा इचलकरंजीच्या जनतेने मोठा लाभ घेतला.

 

या यशस्वी उपक्रमाच्या धरतीवर, यावर्षी पुन्हा शहराध्यक्ष अमृत मामा भोसले आणि युवा अध्यक्ष जयेश बुगड यांच्या नेतृत्वात नामदेव मैदानात अटल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीच्या महोत्सवात 6 मोठ्या प्रकारचे पाळने आणि 12 प्रकारची खेळणी उपलब्ध असणार आहेत, ज्यांची तिकीटे 20 ते 30 रुपयांमध्ये असतील. मोठ्या मोटर पाळण्यांचे दर केवळ 40 रुपये ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना परवडणारी आणि आनंददायक अनुभव घेता येणार आहे.

 

या महोत्सवातील आणखी एक विशेष बाब म्हणजे स्वच्छतेवर विशेष भर दिला गेला आहे. मैदानात उत्तम प्रतीचे मिनरल पाणी, स्वच्छ खाऊ स्टॉल्स आणि पुरुष-महिला सुरक्षारक्षकांची तैनाती करण्यात आली आहे. याशिवाय, पार्किंगसाठी कमी गर्दीची सोय आणि नागरिकांसाठी स्वतंत्र उभे राहण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महोत्सवाचे आयोजन भाजपा अटल महोत्सव आयोजक श्री. शुभम बरगे आणि संयोजक श्री. हेमंत वरुटे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे, तर सहसंयोजक म्हणून मनोज तराल, नामदेव सातपुते, आणि शुभम भाकडे कार्यरत आहेत.

 

दरम्यान आतापर्यंत या महोत्सवाला यंदाही भरघोस प्रतिसाद लाभत असून दररोज नवनवीन लोक येथे भेट देत आहेत आणि आपल्या कुटुंबासह मनमुराद आनंद लुटत आहेत. याशिवाय सर्वांनीच या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. शुभम बरगे आणि संयोजक श्री. हेमंत वरुटे यांच्यासह सर्वच संयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -