Thursday, November 7, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? किती आहे त्यांची संपत्ती ? जाणून...

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? किती आहे त्यांची संपत्ती ? जाणून घ्या

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. सर्व पक्षातील उत्सुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी ८ हजार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? हा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे ? याची उत्सुकता तुम्हालाही असेल तर चला जाणून घेऊया महाराष्ट्र विधसभा २०२४ मधील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ?

 

तर सर्वात श्रीमंत उमेदवाराचं नाव आहे पराग शाह. हे भाजपाचे उमेदवार असून ते घाटकोपर पूर्वचे विद्यमान आमदार आहेत, निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ₹ 3383.06 कोटी आहे. गेल्या 5 वर्षात शाह यांच्या संपत्तीत 575 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांनी त्यांच्या मालमत्तेचे मूल्य ₹ 550.62 कोटी घोषित केले होते.

 

50 टक्के रक्कम दान

 

पराग शाह यांनी टीव्ही चॅनल ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, ‘मी एक प्रामाणिक उमेदवार आहे. मी प्रामाणिक नाही असा दावा माझ्या शत्रूंनीही केला नाही. माणसाची संपत्ती म्हणजे पैसा नसून त्याच्या भावना आहेत असे ते म्हणाले, ‘अनेक लोकांकडे पैसा आहे, पण मला त्याचा चांगला वापर करायचा आहे. मला विश्वास आहे की मला देवाने सर्व काही दिले आहे, देशाने मला सर्व काही दिले आहे, म्हणून मी देखील काहीतरी दिले पाहिजे.मी एक नेता, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ताही आहे. मी माझ्या बचतीच्या 50 टक्क्यांहून अधिक समाजसेवेसाठी देतो.” असे ते म्हणाले.

 

 

व्यावसायिक पराग शहा

पराग शहा यांचा देशाच्या अनेक भागात मोठा व्यवसाय आहे. त्यांचा अनेक राज्यांमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. शाह यांनी 2017 मध्ये बीएमसीची निवडणूक लढवली आणि त्यादरम्यान ते बीएमसीच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले. शाह यांच्याकडे महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक जमिनी आहेत. त्याचे घाटकोपर, चेंबूर येथे फ्लॅट आणि ठाण्यात बंगला आहे. पराग शाह हा उस्मानिया विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर आहे.या काळात त्यांनी 690 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -