इचलकरंजीत काल सोमवारी सकाळी नदीवेस रोडला अपघात घडला आणि यामध्ये एक दांपत्य ठार झाले. या वृत्ताने शहर व परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली.
देवदर्शन करून परत येताना या दांपत्याच्या दुचाकीलां पाठीमागून डंपरची धडक बसल्याने हा अपघात घडला. यामध्ये संजय सदाशिव वडिंगे, सौ सुनीता संजय वडींगे राहणार मंगळवार पेठ इचलकरंजी हे दाम्पत्य ठार झाले. ही घटना सोमवारी इचलकरंजीतील यशोदा पुला नजीक घडली.
दरम्यान डंपर चालकाला ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे.