Wednesday, December 11, 2024
Homeतंत्रज्ञानRedmi स्मार्टफोनचा धमाका ; Redmi Note 14 सीरिज तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध

Redmi स्मार्टफोनचा धमाका ; Redmi Note 14 सीरिज तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध

भारतीय स्मार्टफोन बाजारात बजेट सेगमेंटमध्ये उत्कृष्ट स्मार्टफोन ऑफर करणाऱ्या कंपन्यांमध्ये रेडमीने आपली नवीन Redmi Note 14 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये तीन मॉडेल्स असून, त्यात Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ चा समावेश होतो. हे फोन ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत.

 

Redmi Note 14

रेडमी नोट 14 हा या सीरिजचा पहिला स्मार्टफोन असून त्यात 6.67 इंचाचा FHD+ डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेट) दिला आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसरवर आधारित हा फोन उत्तम कामगिरी करतो. ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे, तर 20MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच 5110mAh क्षमतेची बॅटरी 45W फास्ट चार्जिंगसह आहे.

 

Redmi Note 14 Pro

 

हा मॉडेल 6.67 इंचाचा 3D कर्व्हड AMOLED डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेट) आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसरसह येतो. कॅमेरामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 20MP सेल्फी कॅमेरा आहे. तसेच यामध्ये 5500mAh क्षमतेची बॅटरी 45W चार्जिंगला सपोर्ट करते.

 

Redmi Note 14 Pro+ (5G)

सीरिजमधील सर्वात प्रीमियम मॉडेलमध्ये 6.67 इंचाचा 3D कर्व्हड AMOLED डिस्प्ले (120Hz) दिला असून स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसरवर आधारित आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 50MP पोर्ट्रेट कॅमेरा, आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. 6200mAh क्षमतेची बॅटरी 90W फास्ट चार्जिंगसह दिली आहे.

 

किंमत

 

Redmi Note 14 सीरिजच्या स्मार्टफोनची किंमत विविध कॉन्फिगरेशनसह उपलब्ध आहे. Redmi Note 14 ची किंमत 18999 (6GB+128GB),19999 रुपये (8GB+128GB), आणि 21999 रुपये (8GB+256GB) आहे. Redmi Note 14 Pro साठी, किंमत 24999 (8GB+128GB) आणि 26999 (8GB+256GB) अशी आहे. त्याचप्रमाणे Redmi Note 14 Pro+ (5G) च्या विविध मॉडेल्ससाठी किंमत 30999 (8GB+128GB), 32999 (8GB+256GB), आणि 35999 (12GB+512GB) आहे. तसेच हे स्मार्टफोन तीन रंगामध्ये उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -