Wednesday, December 11, 2024
Homeमहाराष्ट्रबर्थडे पार्टी पडली महागात! दिल्लीवरून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यानं दारूच्या नशेत महिला पोलीस...

बर्थडे पार्टी पडली महागात! दिल्लीवरून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यानं दारूच्या नशेत महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं अन्…

पुण्यात काल रात्री एका महिला कॉन्स्टेबलला नाकाबंदी दरम्यान उडवल्याची घटना घडली आहे. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी कारने नाकाबंदीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली. पुणे स्टेशन परिसरात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर अज्ञात चार चाकी वाहनचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. आज या घटनेबाबत पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी माहिती दिली आहे.

 

दिल्लीहून पुण्याला मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्याने दारूच्या नशेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवण्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी रात्री कोरेगाव पार्क परिसरात नाकाबंदीसाठी असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवत दहा ते वीस मीटर पर्यंत एका चार चाकी वाहनाने फरपटत नेलं. या अपघातात ती महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाली. याच प्रकरणात या कारचालकाला गाडीसह पुणे पोलिसांनी अटक केली असून अर्णव सिंघल असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अपघाताच्या दिवशी या आरोपीसोबत त्याचे आणखीन तीन ते चार मित्र गाडीत असल्याची देखील माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. अर्णव हा दिल्लीवरून खास त्याच्या मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी आला होता आणि कोरेगाव पार्कमध्ये बर्थडे पार्टी करून दारूच्या नशेत त्याने कार चालवली आणि नाकाबंदीसाठी उभा असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं. याच प्रकरणी अर्णवला आता अटक झाली असून तीन दिवसाची पोलीस कोठडी देखील त्याला सुनावण्यात आली आहे.

 

या प्रकरणी पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील काय म्हणाल्या

 

आरोपी पुण्यात फिरण्यासाठी आला होता. तो आणि त्याचे काही मित्र गाडीतून येत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. त्यावेळी गाडी न थांबवता ट्रिपल बॅरिकेटला धडकून ते गेले आणि त्यावेळी तिथे उभे असणाऱ्या एका पोलीस महिला कर्मचारी यांना देखील त्यांनी धडक दिली. त्या गाडीसोबत पन्नास ते साठ मीटर फरपटत गेल्या. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. परंतु ते गाडी न थांबवता आरोपी तसाच पुढे निघून गेला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. गाडीचा वेग भरधाव होता. पूर्ण रस्त्यावरच्या सीसीटीव्ही आम्ही चेक करत होतो. दुसऱ्या दिवशी रात्री ही गाडी आम्हाला सापडली.

 

कोरेगाव पार्कच्या हद्दीमध्ये खाजगी सीसीटीव्हीच्या मदतीने, सोसायटीच्या सीसीटीव्हीने, त्याचबरोबर हॉटेलच्या सीसीटीव्हीने, चेक करण्यात आला. त्यानंतर त्या गाडीचा नंबर समजला गाडीचा नंबर मिळाल्यानंतर त्यावरून गाडीचा मालक कोण आहे. याची माहिती काढण्यात आली. त्यावेळी समजलं ही कार झूम कार वरून भाड्याने घेण्यात आली होती. यादरम्यान ही कार कोणाला भाड्याने दिली होती त्याची माहिती काढण्यात आली. संबंधित आरोपी हा खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडला. तो आणि त्याचा मित्र पुण्यात दिल्लीवरून आलेले होते. त्यांचे इतर दोन मित्र पुण्यात होते. असे चौघेजण त्यादिवशी रात्री कोरेगाव पार्कमध्ये गेले होते आणि परत येताना त्यांच्याकडून हा अपघात झाला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -