Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाला मोठा झटका!, रोहित शर्मा जखमी

टीम इंडियाला मोठा झटका!, रोहित शर्मा जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या दौ-यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Injured) मुंबईत प्रशिक्षणादरम्यान जखमी झाला आहे. थ्रो डाऊन स्पेशालिस्ट राघवेंद्रचा चेंडू सरळ हातावर लागल्याने रोहितला ही दुखापत झाली. या दुखापतीबाबत अपडेट लवकरच मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, पहिल्यांदा नेटमध्ये अजिंक्य रहाणेने ४५ मिनिटे फलंदाजी केली. रहाणेनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma Injured) सरावासाठी आला. यादरम्यान चेंडू त्याच्या ग्लोव्हजवर आदळला. त्यानंतर तो वेदनेने ओरडताना दिसला. यानंतर काही खेळाडू त्याच्याकडे धावले. यावेळी वातावरण चिंताग्रस्त झाले होते, अशी माहिती मिळते. रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करत आहेत. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत या सर्व खेळाडूंचा संघात सहभाग नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -