टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध टी 20I मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही जिंकली आहे. टीम इंडिया 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाने रविवारी 9 फेब्रुवारीला कर्णधार रोहित शर्मा याच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर 300 पेक्षा अधिक धावांचं आव्हान हे सहज पूर्ण करत 4 विकेट्सने सामना जिंकला. त्यानंतर आता टीम इंडिया तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया तिसऱ्या सामन्यासह विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी उत्सूक आहे. हा सामना कुठे आणि कधी पाहता येईल? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी 12 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, गुस ऍटकिन्सन, मार्क वुड, जेमी ओव्हरटन आणि जेमी स्मिथ.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह.