Monday, March 24, 2025
Homeमहाराष्ट्रभारताची एआय क्रांती: परवडणाऱ्या नवकल्पनांसह भविष्याची दिशा

भारताची एआय क्रांती: परवडणाऱ्या नवकल्पनांसह भविष्याची दिशा

सध्या आपला देश एआयमधील क्रांतिकारक बदलाचा साक्षीदार बनला आहे. पंतप्रधान मोदींचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व या बदलाच्या केंद्रस्थानी आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच, सरकार थेट एआय इकोसिस्टमला प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे आता संगणकीय शक्ती, (GPUS), आणि संशोधन संधी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होत आहेत.

 

एआय फक्त काही निवडक लोकांसाठी मर्यादित न राहाता, तसेच ज्या बड्या बाजापेठांवर मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी आहे तिथे न जाऊ देता, एआयचं तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना व स्टार्टअप्सपर्यंत पोहोचावं यासाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे. मोदी सरकारच्या भव्य धोरणांच्या माध्यमातून, एआय क्षेत्रात भारताने एक प्रामाणिक वावर सुरू केला आहे. भारताची एआय इकोसिस्टम सुधारण्यासाठी मोदी सरकारने भारतAI मिशन, एआय उत्कृष्टता केंद्रे, आणि अनेक इतर महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. मोदी सरकार भारताला एआयच्या ग्लोबल नेतृत्वात आणण्यासाठी काय करत आहे ते जाणून घेऊयात.

 

भारत AI मिशन

 

भारताच्या एआय इकोसिस्टमला मजबूती देण्यासाठी मोदी सरकारने 2024 मध्ये भारतAI मिशन मंजूर केलं आणि त्यासाठी 10,300 कोटींची रक्कम निर्धारित केली. पुढील पाच वर्षांमध्ये हा निधी विविध भागांमध्ये भारत AI मिशनच्या अंमलबजावणीसाठी वापरला जाणार आहे.

 

हे मिशन भारतीय भाषांमध्ये भारताच्या संदर्भासाठी स्थानिक एआय सोल्यूशन्स कस्टमाइज करण्यासाठी एक अत्याधुनिक संगणकीय सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. एआय मॉडेल 10,000 GPUs वर सुरू होत आहे, आणि लवकरच बाकीचे 8693 GPUs देखील जोडले जातील.

 

GPU इन्फ्रास्ट्रक्चर आणि ओपन GPU बाजारपेठ

 

भारत AI मिशनच्या शुभारंभाच्या 10 महिन्यांमध्ये, सरकारने 18,693 ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) चे अत्याधुनिक आणि मजबूत संगणकीय सुविधा तयार केल्या आहेत. हे ओपन सोर्स मॉडेल DeepSeek पेक्षा जवळपास नऊ पट जास्त आहे, आणि ChatGPT च्या GPU संरचनेच्या दोन तृतियांश इतके आहे.

 

भारत सरकारने GPU बाजारपेठ उघडली आहे, आणि भारतात GPU बाजारपेठ उघडणारे हे पहिले सरकार आहे. यामुळे छोट्या स्टार्टअप्स, संशोधक, आणि विद्यार्थ्यांना उच्च-प्रदर्शन संगणकीय संसाधने सहज उपलब्ध होणार आहेत.

 

भारत AI डेटासेट प्लॅटफॉर्म

 

डेटा हे एआय संशोधन आणि नवकल्पनेचे इंधन आहे, आणि विविध, समृद्ध आणि भरपूर डेटासेट्सची आवश्यकता आहे. मोदी सरकारने ओपन डेटासेट्सचा प्रवेश अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यासाठी भारतAI डेटासेट प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे. हा प्लॅटफॉर्म भारतीय स्टार्टअप्स आणि संशोधकांसाठी उच्च-गुणवत्तेचे, गैरवैयक्तिक डेटासेट्स सहज उपलब्ध करून देऊ शकतो.

 

एआय उत्कृष्टता केंद्रांची स्थापना

2023 मध्ये, मोदी सरकारने दिल्लीमध्ये आरोग्य, कृषी, आणि शाश्वत शहरांसाठी तीन एआय उत्कृष्टता केंद्रांची स्थापना केली. 2025 च्या बजेटमध्ये शिक्षणासाठी एक नवीन एआय उत्कृष्टता केंद्र स्थापनेसाठी ₹500 कोटींची तरतूद केली आहे.

 

फाऊंडेशनल लार्ज लँग्वेज मॉडेल्स

 

भारत केवळ एक मजबूत एआय इकोसिस्टम तयार करत नाही, तर स्थानिक एआय मॉडेल्सच्या निर्मितीतही महत्त्वपूर्ण प्रगती करत आहे. भारतAI ने लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) आणि स्पेशल लँग्वेज मॉडेल्स (SLMs) तयार करण्यासाठी एक मोठा उपक्रम सुरू केला आहे.

 

भारतजन : जगातील पहिला सरकारी फंडेड मल्टीमोडल LLM उपक्रम

 

भारतजन हा एक जनरेटिव्ह एआय आहे, जो दिल्लीमध्ये 2024 मध्ये सुरू करण्यात आला. हा उपक्रम सार्वजनिक सेवा वितरण आणि नागरिक सहभाग वाढवण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

 

भारताची एआय कौशल्य आणि प्रतिभा वाढती आहे

 

भारतAI भविष्य कौशल्य उपक्रम अंतर्गत, एआयचे अभ्यासक्रम अनेक शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये विस्तृत केले जात आहेत. सरकार 2nd आणि 3rd श्रेणी शहरांमध्ये डेटा आणि एआय लॅब्स स्थापित करत आहे.

 

भारताचं AI क्षेत्रातील जागतिक नेतृत्व

 

BCG च्या एका अहवालानुसार, भारत एआय स्वीकारांमध्ये आघाडी घेत आहे, आणि 80 टक्के कंपन्या एआयला त्यांच्या मुख्य धोरणाचा भाग मानतात, जे जागतिक सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

 

निष्कर्ष : भारताच्या एआय क्षेत्रातील लक्षणीय वाढ आणि भारत AI मिशन, उच्च-प्रदर्शन संगणकीय सुविधा, एआय डेटासेट प्लॅटफॉर्म आणि भारताचे स्थानिक एआय मॉडेल्स यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव भारताच्या एआय क्रांतीला गती देत आहे. भारत आता एआय क्षेत्रात एक जागतिक नेता होण्याच्या मार्गावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -