विक्रमनगर परिसरातील गारमेंट युनिटला मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये गारमेंटमधील मोठ्या प्रमाणात तयार माल व अन्य साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये जवळपास एक कोटी ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा
प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते.
याबाबत घटनास्थळावरून
मिळालेली माहिती अशी, विक्रमनगर परिसरात गौतमकुमार पुरोहित यांच्या मालकीचा गारमेंट कारखाना आहे. याठिकाणी जवळपास ४० मशिनरीचे युनिट- आहे. याठिकाणी परकर तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. पुरोहित यांच्या थोरल्या बंधुंचे निधन झाल्याने गौतमकुमार हे परगावी गेले होते.
त्यामुळे कारखान्यात डिलिव्हरी न झाल्याने मोठ्या प्रमाणात राहिला होता. या सर्व मालाची डिलिव्हरी उद्या केली जाणार होती. मंगळवारी पहाटे चार
वाजण्याच्या सुमारास गारमेंट
कारखान्यातून धूर येत असल्याचे
परिसरातील यंत्रमाग कारखान्यातील कामगारांच्या निदर्शनास आले. तेव्हा याबाबत सर्वांच्या लक्षात आली.