आयपीएल सुरू होण्यास फक्त एक महिना बाकी आहे. त्याआधी क्रिकेट प्रेमींसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता क्रिकेटप्रेमी आयपीएलचे लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहू शकणार नाहीत.
कारण, JioCinema आणि Disney+Hotstar यांचे विलीनीकरण होऊन JioHotstar तयार झाल्याने आता आयपीएल पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींना पैसे मोजावे लागणार आहे.
फक्त एक मिनीट आयपीएल मोफत पाहता येणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिकेट प्रेमी आता फक्त काही मिनिटांसाठी आयपीएल सामने मोफत पाहू शकतील. त्यानंतर, क्रिकेट प्रेमींना सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की JioHotstar मोबाईलसाठी 149 रुपयांचा प्लॅन, 299 रुपयांचा सुपर प्लॅन आणि 349 रुपयांचा प्रीमियम अॅड फ्री प्लॅन असेल, जो तीन महिन्यांसाठी असेल.
पहिले जिओ सिनेमावर सामने फ्रीमध्ये होते
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला JioCinema वर आयपीएल सामने मोफत पाहता येणार होते. पण, या विलीनीकरणानंतर, क्रिकेट प्रेमींना आता सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. गेल्या वर्षी डिस्ने + हॉटस्टार आणि रिलायन्सचे व्हायाकॉम 18 यांचे विलीनीकरण झाले आणि आता वापरकर्त्यांना जिओ सिनेमा आणि डिस्ने + हॉटस्टारचे विलीनीकरण पाहायला मिळत आहे.
ही सुविधा सबस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध
जिओस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी (डिजिटल) किरण मणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जिओहॉटस्टारच्या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC), इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि महिला प्रीमियर लीग (WPL) सारखे प्रमुख सामने पाहता येतील. एवढेच नाही तर तुम्ही आयसीसी इव्हेंट्स, आयपीएल, डब्ल्यूपीएल सारख्या मोठ्या स्पर्धा पाहू शकता.