Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्ररॅपिडोकडून ‘पिंक रॅपिडो’ उपक्रम जाहीर; 25 हजार महिलांना मिळणार रोजगारांची संधी

रॅपिडोकडून ‘पिंक रॅपिडो’ उपक्रम जाहीर; 25 हजार महिलांना मिळणार रोजगारांची संधी

देशातील आघाडीची कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपनी रॅपिडो लवकरच महिलांसाठी एक खास सेवा सुरू करणार आहे. या सेवेत रॅपिडो (Rapido) ‘पिंक रॅपिडो’ (Pink Rapido) उपक्रमाखाली तब्बल २५ हजार महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यंत रॅपिडोच्या माध्यमातून फक्त पुरुष चालकच कॅब, ऑटो आणि बाईक चालवत होते. मात्र, आता महिलाही रॅपिडोच्या माध्यमातून बाइक चालवण्याची संधी मिळवणार आहेत.

 

खास म्हणजे, ही सेवा सुरुवातीला कर्नाटकातील बंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर इतर शहरांमध्येही ती विस्तारली जाणार आहे.रॅपिडोचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली यांनी जागतिक गुंतवणूकदार परिषदेत या नव्या उपक्रमाची घोषणा करत म्हणले आहे की, “महिला चालकांना सहभागी करून घेत, आम्ही २५,००० महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,”

 

त्यानुसार , महिलांना प्रवासादरम्यान सुरक्षित वाटावे, यासाठी पिंक रॅपिडोमध्ये केवळ महिला चालक असतील. अनेकदा महिला प्रवाशांना कॅब किंवा ऑटो सेवेदरम्यान गैरवर्तनाच्या घटना सहन कराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर फक्त महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही सेवा अधिक सुरक्षित ठरणार आहे.

 

रॅपिडोने जाहीर केले आहे की, ‘पिंक रॅपिडो’ सेवा या वर्षाच्या अखेरीस सुरू केली जाणार आहे. सध्या बंगळुरूमध्ये तिची चाचणी प्रक्रिया सुरू आहे. ती यशस्वी झाल्यास देशभरात ही सेवा लागू केली जाणार आहे. रॅपिडोच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, दुचाकी चालवण्याचा अनुभव असलेल्या महिलांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या नव्या उपक्रमामुळे महिलांना नवीन व्यवसायिक संधी उपलब्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -