सर्वसामान्य नागरिकांना बँकेच्या रांगेत उभे राहून वेळ वाया घालवू लागू नये म्हणून एटीएमसारखी सुविधा सुरू करण्यात आली. कधीकाळी केवळ मेट्रो सिटीत असणाऱ्या एटीएम मशिन्स आता गावागावात लागल्या आहेत.
राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांमधूनही ग्राहकांना एटीएम सुविधा मिळत असून गावोगावी एटीएममधून पैसे काढता येत आहेत. मात्र, याच एटीम मशिन्स कधी कधी चोरट्यांचं लक्ष्य ठरत आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता शहरातील विविध एटीएममध्ये फ्रॉड करून ग्राहकांचे पैसे काढणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा मध्यप्रदेशमधील असून त्याच्याजवळून विविध बँकांच्या ग्राहकांचे तब्बल 69 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सर्व एटीएम जप्त केले असून या गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्याचं तपासातून समोर आलय. सदर आरोपी दिपक राजेंद्र सोनी हा मुळचा मध्यप्रदेशातील असून त्याने लाखो रुपयांची रक्कम लुटल्याचे उघड झाले आहे.
शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये एक संशयित दिसल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली होती. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ पावले उचलत संशयित इसमाला बँक परिसरातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याचेकडे वेगवेगळ्या बँकांचे 69 एटीएम कार्ड आढळून आले आहेत. एटीएम कार्डच्या स्लॉटमध्ये चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचा प्रकार आरोपीकडून केला जात होता.
पोलिसांनी आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याचेकडे वेगवेगळ्या बँकांचे 69 एटीएम कार्ड आढळून आले आहेत. एटीएम कार्डच्या स्लॉटमध्ये चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचा प्रकार आरोपीकडून केला जात होता.