पोषक वातावरणामुळे फळभाज्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याने राज्यासह परराज्यातून लसूण, फ्लॉवर, शेवगा व कोबीची आवक वाढली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी पडल्याने या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.
याउलट मागणीपेक्षा आवक कमी पडल्याने हिरवी मिरचीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 2) 90 ट्रकमधून शेतमाल दाखल झाला. गतआठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांच्या आवकेत दहा ट्रकने घटल्याचे सांगण्यात आले. लसूण, फ्लॉवर, शेवगा, कोबी व हिरवी मिरची वगळता उर्वरित सर्व फळभाज्यांच्या मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे 7 ते 8 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा 5 ते 6 टेम्पो, राजस्थान येथून 7 ते 8 ट्रक गाजर, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, राजस्थान येथून सुमारे 8 ते 10 टेम्पो मटार, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 5 ते 6 टेम्पो तोतापूरी कैरी, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, हिरवी मिरची प्रत्येकी 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार पेटी, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो टोमॅटो 8 ते 10 हजार पेटी, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 80 ते 90 ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 टेम्पो इतकी आवक झाली.
मेथी, कोथिंबीर, कांदापात, पालक भावात वाढ
बाजारात पालेभाज्यांची घटलेली आवक कायम आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवार (दि. 2) मेथी, कोथिंबीर, कांदापात, मुळे, पालकच्या भावात जुडीमागे 1 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. येथील बाजारात कोथिंबिरीची सुमारे 90 हजार जुडी तर मेथीची 50 हजार जुडी आवक झाली होती. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. घाऊक बाजारात पालेभाजीच्या एका गड्डीला 3 ते 15 रुपये दर मिळाला. तर किरकोळ बाजारात एका गड्डीची 5 ते 20 रुपयांना विक्री सुरू आहे.