नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमच्यासाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. मीडियामध्ये करिअर करण्याची ही उत्तम संधी आहे.
एनसीईआरटीने अँकर, व्हिडिओ एडिटर, कॅमेरामॅनसह अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही www.ncert.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
एनसीईआरटीने जारी केलेल्या माहितीनुसार, या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नाही. उमेदवारांचे थेट इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन होणार आहे. या नोकरीसाठीते इंटरव्ह्यू १७ ते २२ मार्चपर्यंत होणार आहे.
अँकर पदासाठी १७ मार्च रोजी इंटरव्ह्यू आहे. प्रोडक्शन असिस्टंट पदासाठी १८ मार्च २०२५ रोजी इंटरव्ह्यू होणार आहे. व्हिडिओ एडिटर पदासाठी १९ मार्च, साउंट रेकॉर्डिस्ट पदासाठी २० मार्च रोजी इंटरव्ह्यू होणार आहे. कॅमेरामॅन पदासाठी २१ मार्च रोजी मुलाखत होणार आहे.
अँकर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी भाषा येणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. प्रोडक्शन असिस्टंट पदासाठी डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. याचसोबत २ वर्षांचा अनुभव असायला हवा.
ग्राफिक असिस्टंट पदासाठी फाइन आर्ट्समध्ये ग्राफिक आणि अॅनिमेशन डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठीच्या इंटरव्ह्यूसाठी दिलेल्या तारखेला सकाळी ९ वाजता CIET, NCERT, नई दिल्ली येथे उपस्थित राहावे लागेल. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६० हजार रुपये पगार मिळणार आहे.याबाबत अधिक माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.