Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रसुनेने केला सासूचा खून, मृतदेह पोत्‍यात भरला अन् तितक्‍यात...

सुनेने केला सासूचा खून, मृतदेह पोत्‍यात भरला अन् तितक्‍यात…

शहरातील भोकरदन नाका येथे सुनेने सासूचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खून केल्यानंतर गुन्हा उघड होउ नये यासाठी सुनेने सासुचा मृतदेह पोत्यात भरुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला

 

शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता संजय शिनगारे (वय 45) या सासुचा कौंटुबीक वादातुन संशयित सून प्रतिक्षा शिनगारे हिने खून केल्याची घटना घडली.

 

या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता शिनगारे या सून प्रतीक्षा शिनगारे यांच्यासोबत किरायाच्या घरात राहतात. सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहत असल्याने घरी सासू आणि सून दोघीच होत्या. कौटुंबिक वादातून आज (बुधवार) पहाटे सुनेने सासूच्या डोक्यात जोरदार वार केला. यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला.

 

यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतिक्षाने मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला. मात्र, घर मालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लागलीच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रतीक्षा हिने सासुचा मृतदेह सोडून ती फरार झाली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सदरबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती यांनी भेट दिली. खुनाच्या घटनेनंतर सून प्रतिक्षा ही फरार झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमर्‍यांचे फुटेज घेतले आहेत. संशयित आरोपीच्या शोधार्थ एलसीबी आणि सदरबाजार पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -