Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रमंगल मंगल हो, शेअर बाजाराची मोठी उसळी, 1000 अंकानी वधारला सेन्सेक्स

मंगल मंगल हो, शेअर बाजाराची मोठी उसळी, 1000 अंकानी वधारला सेन्सेक्स

सोमवार हा शेअर बाजारासाठी घातवार ठरला होता. त्यानंतर मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा तेजीचे सत्र आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाला वाकुल्या दाखवत सेन्सेक्स 1100 अंकांनी वधारला. तर निफ्टी 22 हजार 500 अंकावर उघडला. दलाल स्ट्रीटवरील सेन्सेक्समधील 30 कंपन्यांमधील 29 कंपन्यांमध्ये तेजी दिसून आली. तर मुख्य निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 1.66 टक्क्यांच्या तेजीसह 74,352.56 वर व्यापार करत होता.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने टॅरिफ प्लॅन लागू केला आहे. तर अनेक देशांना आयात शुल्क कमी करण्याची धमकी देण्यात येत आहे. या आक्रमक व्यापारी धोरणामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी भारतीय बाजार उघडताच 3000 अंकांनी घसरला. 2024 मध्ये निवडणुकीनंतर ही पहिल्यांदाच झालेली सर्वात मोठी घसरण ठरली. पण आज शेअर बाजाराने त्याची चाल बदलली. मंगळवारी बाजार उघडताच दलाल स्ट्रीट हिरव्या रंगात न्हाऊन निघाला. सेन्सेक्सने उसळी घेत 1,000 अंकांवर मजल मारली.

 

सोमवारी गुंतवणूकदारांची फजिती

शेअर बाजार सध्या बहारला आहे. पण सोमवारी, 7 एप्रिल 2025 रोजी बाजाराची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. शेअर बाजारात या वर्षातील दुसरी सर्वात मोठी घसरण आली होती. सेन्सेक्स 2226 अंक म्हणजे 2.95 टक्क्यांच्या घसरणसह 73,137 अंकावर बंद झाला होता. तर निफ्टीने 742 अंकांची म्हणजे 3.24 टक्क्यांची डुबकी घेतली होती. निफ्टी 22,161 अंकावर बंद झाला होता. सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअरमध्ये घसरण दिसली होती.

 

टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रोमध्ये काल 7 टक्क्यांची घसरण दिसली. झोमॅटोचा शेअर 0.17 टक्क्यांहून अधिकवर बंद झाला होता. NSE च्या विविध श्रेणी निर्देशांकानुसार, निफ्टी मेटल सर्वाधिक 6.75 टक्क्यांची घसरण झाली. रिअल्टीमध्ये 5.69 टक्क्यांची घसरण दिसून आली होती. तर ऑटो, फार्मा, सरकारी बँक, ऑईल अँड गॅस, आयटी सेक्टर 4 टक्क्यांहून कमी बंद झाले होते. मंगळवारी बाजाराने घसरणीला ब्रेक लावला. सेन्सेक्सच्या 30 शेअरमधील 29 शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसले. अजून दुपारपर्यंत बाजार कुस बदलतो का? दुपारच्या सत्रानंतर बाजाराची चाल समोर येईल असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -