Friday, June 27, 2025
Homeब्रेकिंगसाताऱ्यात स्विफ्ट कार ओमिनीला धडकत पुढच्या पिकअपला आदळली, तिहेरी अपघातात 2 जिवलग...

साताऱ्यात स्विफ्ट कार ओमिनीला धडकत पुढच्या पिकअपला आदळली, तिहेरी अपघातात 2 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू, 6 जखमी

साताऱ्यात वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातात दोन जिवलग मित्र जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

भरधाव वेगात निघालेल्या स्विफ्ट कारने ओमिनी कारला धडक देऊन पुढे वडूज च्या दिशेने निघालेल्या पिकअप गाडीला धडक दिली.

अपघातात औंध येथील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार अशी मृत्यू झालेल्या दोन युवकांची नावे आहेत.

 

सर्व रुग्णांवर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात तिन्ही गाड्यांचे मोठं नुकसान झाले आहे याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

साताऱ्यात दहिवडी-वडूज रस्त्यावर तिहेरी अपघातात औंध येथील दोन युवक ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -