Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रासाठी खुशखबर! लवकरच धावणार नवी सर्किट ट्रेन, फडणवीसांची मोठी घोषणा

महाराष्ट्रासाठी खुशखबर! लवकरच धावणार नवी सर्किट ट्रेन, फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात लवकरच “छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन” सुरु होणार असून, ही ट्रेन राज्यातील ऐतिहासिक स्थळांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ‘वेव्ह्स समिट 2025’ दरम्यान या सर्किट ट्रेनसह अनेक रेल्वे प्रकल्पांची(political updates) घोषणा केली. एकूण १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू असून, यात १३२ स्थानकांचा पुनर्विकासही समाविष्ट आहे.

 

या सर्किट ट्रेनमुळे प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या किल्ल्यांना भेट देता येणार आहे. ही ट्रेन दहा दिवसांचा विशेष टूर घेऊन विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेट देईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळणार असून, प्रवाशांना एक अनोखा अनुभव घेता येणार आहे.

 

या कार्यक्रमात मुख्यमंत्री(political updates) फडणवीस यांनी गोंदिया ते बल्लारशा या रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणासाठी ४८१९ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती दिली. या लाईनचा विकास झाल्याने विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणामधील व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. गोंदिया हे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेलगत असल्यामुळे या भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

 

गोंदिया-बल्लारशा मार्ग हा धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असून, यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्यप्रदेशाशी जोडणी अधिक प्रभावी होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक विकास, औद्योगिक वाढ आणि रोजगारनिर्मितीलाही गती मिळणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

या कार्यक्रमात १३२ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचीही घोषणा झाली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह अनेक महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांमध्ये मूलभूत बदल केले जाणार आहेत. हे स्थानक भविष्यात पर्यटन व व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहेत.

 

फडणवीस यांनी यावेळी म्हटलं की, “यंदा महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे २४ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात एकूण १० हजार कोटीही मिळाले नव्हते. सध्याचे सरकार हे महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -