Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रसोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक; एक तोळ्यासाठी मोजावे लागणार

सोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक; एक तोळ्यासाठी मोजावे लागणार

गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीचे(reaches) भावात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव अचानक घसरले होते. त्यानंतर सोन्याचे भाव कमी होतील, असं सर्वसामान्यांना वाटतं होतं. मात्र, दोन दिवसांपासून सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. आज तर २४ कॅरेट सोन्याचे भाव २७० रुपयांनी वाढले आहेत. एक तोळा सोन्याचे भाव जवळपास ९६००० रुपये झाले आहेत.ऐन लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. सोन्याचे भाव भविष्यात अजून वाढण्याची शक्यता आहे.१ तोळा सोन्याची किंमत १ लाख रुपये होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर २२ कॅरेट सोन्याची किंमत

गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार, १ ग्रॅम सोन्याची किंमत ८,७७० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७०,१६० रुपये आहे. यात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ तोळा सोन्याची (reaches)किंमत ८७,७०० रुपये आहे. यात २५० रुपयांनी वाढ झाली आहे.

 

 

२४ कॅरेट सोन्याची किंमत

आज १ ग्रॅम सोने ९,५६७ रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७६,५३६ रुपये आहे. १ तोळा सोन्याच्या किंमतीत २७० रुपयांनी वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम सोने ९५,६७० रुपयांना विकले जात आहे.

 

१८ कॅरेट सोने

१ ग्रॅम सोन्याची किंमत ७,१७६ रुपये आहे. ८ ग्रॅम(reaches) सोन्याची किंमत ५७,४०८ रुपये आहे. तर १ तोळा सोन्याची किंमत ७१,७६० रुपये झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -