नागपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. भांडेवाडी परिसरात काल रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या (Nagpur Crime News) करण्यात आल्याचे उघड झाले आहे. सतीश मेश्राम (31 वय वर्ष) असे हत्या (Nagpur Crime News) झालेल्या तरुणाचे नाव असून तो बांधकाम साइटवर काम करायचा. दोन दिवसांपूर्वी कामावर गेलेला सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्याच प्रयत्नात पारडी पोलीस स्टेशनमध्ये तो मिसिंग असल्याची (Nagpur Crime News) तक्रार ही देण्यात आली होती. काल रात्री भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म जवळ काही लोकांना सतीशचा मृतदेह आढळून आला. तेव्हा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सतीशची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे
मिळालेल्या माहितीनुसार काल (शुक्रवारी) रात्री भांडेवाडी परिसरात सतीश मेश्राम (31 वय वर्ष) या तरुणाची हत्या (Nagpur Crime News) करण्यात आली. सतीश मेश्राम (31 वय वर्ष) हा गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असतानाच अखेर त्याचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सतीश कालिदास मेश्राम (31, एकतानगर) असे मृताचे (Nagpur Crime News) नाव आहे. तो बांधकामाचं काम करायचा. गुरुवारी सकाळी तो कामावर गेला होता. मात्र तो घरी आलाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र काहीच पत्ता लागला नाही. पारडी पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी तक्रारदेखील केली होती. (Nagpur Crime News)
शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्मजवळ एका नागरिकाला सतीशचा मृतदेह आढळला. त्याने पोलिसांना माहिती दिली. पारडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सतीशच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार झाल्याचे दिसून येत होते. सतीशजवळ पोलिसांना एक मोबाइल सापडला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता तो मोबाइल एका लग्नातून चोरीला गेल्याची बाब समोर आली. पोलिसांनी रात्री उशिरा तीन संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी सुरू केली. सतीशचा कुणाशी वाद होता का व त्यातून हा प्रकार झाला आहे का याचा तपासदेखील पोलीस करत आहेत.