Wednesday, September 17, 2025
Homeब्रेकिंगधक्कादायक, मंदिराच्या प्रसादातच सापडला सांप, भाविकात हडकंप…

धक्कादायक, मंदिराच्या प्रसादातच सापडला सांप, भाविकात हडकंप…

तमिलनाडुच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसुरच्या चंद्रचूडेश्वर मंदिरात भक्तांना दिलेल्या प्रसादात चक्क साप सापडल्याची खळबळजनक बातमी व्हायरल होत आहे. या प्रकरणाचा सध्या तपास केला जात आहे. या प्रकरणात चंद्रचुडेश्वर मंदिराच्या प्रशासनाने वा हिंदु धर्मार्थ देखभाल विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.

 

तमिलनाडुच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसुर येथील चंद्रचूडेश्वर मंदिर प्रचंड प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर ८०० वर्षे पुरातन आहे. या मंदिरात दरदिवशी ८०० ते १००० भक्त दर्शनासाठी येत असतात. बंगळुरु आणि कृष्णगिरीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवर असलेले हे मंदिर हिंदू धार्मिक आणि धर्मार्थ देखभाल विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. या मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भक्तांना वाटल्या जाणाऱ्या प्रसादात सापाचे पिल्लु सापडल्याने खळबळ उडाली आहे.

 

मंदिर प्रशासनाचे कानावर हात

 

या मंदिराच्या प्रसादात सापाचे पिल्लू सापडल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. चंद्रचुडेश्वर मंदिरात भक्तांना मोठी गर्दी होत असते. या मंदिरात अशा प्रकारे सापाचे पिल्लू प्रसादात सापडल्याने भक्तांमध्ये नाराजी आहे. जेव्हा भाविकांना प्रसादात अशा प्रकारे सापाचे पिल्लु सापडल्याची तक्रार केली तेव्हा मंदिर प्रशासनाने कानावर हात ठेवले आहेत. त्यांना या संदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही. त्यानंतर भक्तांनी मंदिराचा कारभार पाहाणाऱ्या धर्मार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात लेखी तक्रार दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -