Thursday, February 12, 2026
Homeमहाराष्ट्ररोहित शर्माची तडकाफडकी निवृत्ती; टीम इंडियाला मोठा धक्का

रोहित शर्माची तडकाफडकी निवृत्ती; टीम इंडियाला मोठा धक्का

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने कसोटी क्रिकेट मधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. सद्यस्थितीत रोहित शर्मा कडे फक्त कसोटी संघाचे नेतृत्व होते. आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा खेळणार की नाही यावर गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू असतानाच आता रोहित ने अचानकपणे कसोटी मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितच्या या निर्णयामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसलेला आहे.

रोहितने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये लिहिले की, सर्वंना नमस्कार, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे, ही गोष्ट मी शेअर करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये माझ्या देशाचं नेतृत्त्व करणं हा सन्मान आहे. इतक्या वर्षांच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी सर्वांना धन्यवाद. मी भारताचं प्रतिनिधीत्व एकदिवसीय सामन्यांमध्ये करत राहीन. पण, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहितने स्पष्ट केले की, तो सध्या एकदिवसीय स्वरूपात खेळत राहील. तो म्हणाला, “मी एकदिवसीय स्वरूपात भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन.”

रोहितने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4 हजार 302 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 88 षटकार आणि 473 चौकार लगावले. रोहितने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावलं होतं. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -