Saturday, July 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: पतीच्या आत्महत्येने निराश पत्नीनेही केली आत्महत्या, प्रेमविवाह करुन झाले होते अवघे...

इचलकरंजी: पतीच्या आत्महत्येने निराश पत्नीनेही केली आत्महत्या, प्रेमविवाह करुन झाले होते अवघे काही महिने

प्रेमविवाह केलेल्या जोडप्यातील पतीने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. या नैराश्यातून बुधवारी पत्नीनेही गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. आरोशी प्रणव पारखे (वय १९, रा. श्रीरामनगर, तारदाळ) असे मृत युवतीचे नाव आहे. याबाबत अमर शंकर मोटे (४३, रा. तारदाळ) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.

 

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील आरोशी हिचा प्रणव पारखे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर पारखे कुटुंबीय कोल्हापूरला राहण्यासाठी गेले. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत प्रणव याने आत्महत्या केली. पतीच्या मृत्यूमुळे आरोशी कोल्हापूरहून माहेरी तारदाळ येथे येऊन आई-वडिलांसोबत वास्तव्यास सुरुवात केली होती.

 

पती प्रणव यांच्या आत्महत्येला अवघे तीन महिने उलटले. या कालावधीत नैराश्यातून खचलेल्या आरोशी हिने बुधवारी दुपारी आई-वडील कामावर गेल्यानंतर घरात कोणी नसल्याचे पाहून प्रथम डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

मात्र, त्यात यश न आल्याने तिने घराच्या स्लॅबवरील लोखंडी हुकास दोरी बांधून गळफास घेतला. दुपारी आई घरी आल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने तिने खिडकीतून पाहिले असता आरोशीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून तिला खाली उतरवण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पंचनामा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -