Thursday, February 12, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी : बांधकाम कामगार संच वाटप

इचलकरंजी : बांधकाम कामगार संच वाटप

बांधकाम कामगारांना आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते गृहपयोगी वस्तू व अत्यावश्यक संच वितरित केले. नवक्रांती बांधकाम कामगार युनियनतर्फे श्रीमंत ना.बा. घोरपडे नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. भविष्यातही बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार आवाडे यांनी दिली. रमेश पाटील यांनी स्वागत केले. युनियन अध्यक्ष बंडोपंत सातपुते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमोद पवार व मदन मुरगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महावीर जैन, श्रीशेल कित्तुरे, अनिल कांबळे, शंकर नंदरगी, हर्षद सातपुते, सत्यजित निंबाळकर, मनीषा नाईक, संगीता सिंग, उर्मिला सरवदे, स्वाती जाधव, सादिक खलिफा, अनिल जाधव, सचिन बिरंजे, ऐश्वर्या हजारे, आदम मुल्ला आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -