Monday, February 16, 2026
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जूनचा हप्ता, समोर आली अपडेट

लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जूनचा हप्ता, समोर आली अपडेट

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महिलांना जूनचा हप्ता कधी येणार याची प्रतिक्षा लागली आहे. लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.

 

याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण लवकरच ही तारीख जाहीर केली जाईल. दरम्यान, काही लाडक्या बहि‍णींना जून महिन्याचा हप्ता दिला जाणार नाहीये.

 

या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत पैसे (These Women Will Not Get June Month Installment)

 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. या योजनेचा निकषाबाहेर जाऊन कोणी लाभा घेतला असेल तर त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत. लाखो महिलांना आतापर्यंत या योजनेतून बाद करण्यात आले आहेत.

 

महाराष्ट्रातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ ते ६० वोयगटातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनादेखील योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. जर हे उत्पन्न जास्त असेल तरीही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

अनेक महिलांचे अर्ज बाद (Ladki Bahin Yojana Reverification)

 

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक फ्रॉड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यातील अनेक महिला या सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -