Homeमहाराष्ट्रयुवकाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपी फरार

युवकाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपी फरार

युवकाच्या जाचाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणातला आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वाशिम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

 

 

वाशिमच्या शिरपूर तालुक्यातील वाघळूद गावात अभिषेक देशमुख या युवकाने या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसखोरी केली.त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने सेल्फी काढायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता या अभिषेकने या मुलीला लग्नाची मागणी घातली. मुलीने या अभिषेकला थेट नकार दिला. तरी त्याने मुलीला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून या मुलीने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -