Tuesday, February 17, 2026
Homeमहाराष्ट्रभारतात 30 टक्क्यांनी स्वस्त होणार सोनं?; तज्ञ काय सांगतात

भारतात 30 टक्क्यांनी स्वस्त होणार सोनं?; तज्ञ काय सांगतात

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली. मात्र, आता इराण आणि इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमत पडणार असल्याचे चित्र आहे.

 

सोन्याच्या दराबाबत मोठे अपडेट समोर आले आहेत.

 

मंगळवारी सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर आजही सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 2 टक्क्यांनी घसरल्याचे दिसले. आज सोन्याने दोन आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे.

 

आंतरराष्ट्रीय सराफ बाजारात आज स्पॉट गोल्डची किंमत 1.5 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 3316.80 डॉलरवर आली आहे. तर दिवसाच्या व्यवहारादरम्यान ही किंमत 3300 डॉलरच्या खाली पोहोचली. त्याचवेळी, अमेरिकेत सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 3333.9 डॉलरवर आली. हा दर दोन टक्क्यांनी कमी झाला असून, भारतात सोने 30 टक्क्यांनी स्वस्त होऊ शकते असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.

 

अजय केडिया यांनी सांगितले की, ‘पुढील एक-दोन महिन्यांत सोन्याच्या किमतीत 8 ते 10 टक्क्यांची सुधारणा होऊ शकते. पुढील एक वर्षात सोने सरासरी 2750 ते 2800 डॉलर्सची पातळी राखू शकते. दुसरीकडे, मध्य पूर्वेतील परिस्थिती (इराण-इस्राईल युद्ध) शांत झाली तर सोन्यात पुन्हा एकदा 2400 डॉलर्सची पातळी दाखविण्याची ताकद आहे. सध्या, किमती $3400 च्या आसपास आहेत, म्हणजेच सोन्याच्या किमती 17 ते कमाल 30 टक्क्यांनी घसरू शकतात. असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -