Tuesday, February 17, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी: ट्रक अचानकपणे मागे आल्याने अपघात; ७ मोटारसायकलींचे नुकसान

इचलकरंजी: ट्रक अचानकपणे मागे आल्याने अपघात; ७ मोटारसायकलींचे नुकसान

बेजबाबदारपणे पार्किंग केलेला ट्रक अचानकपणे पाठीमागे जात पार्किंग केलेल्या सात मोटारसायकली व आठ सायकली यांना धडक देऊन महावितरणच्या ट्रान्सफॉर्मवर आदळला. येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीतमध्ये मंगळवारी दुपारी हा अपघात

घडला. सदर अपघातात वाहनांचे ६ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी चालक हरपालसिंग धिरुबा जडेजा (वय २६, रा. खोंबडी मोठी, जि.भुज-गुजरात) याला ट्रक (जीजे १२ बीझेड ९२३२) सह ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवारी (दि. २४) सायंकाळच्या सुमारास घडली.

हरपालसिंग याने बेजबाबदारपणे सखल भागाच्या बाजूला ट्रक पार्किंग करून त्यामध्येच तो झोपला होता. त्यावेळी ट्रक पाठीमागे गेल्याने हा अपघात झाला. अधिक तपास कॉन्स्टेबल महेश कोरे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -