Homeइचलकरंजीसुळकूड येथे विद्यार्थ्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने मृत्यू

सुळकूड येथे विद्यार्थ्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने मृत्यू

(ता. कागल) येथे बांधकाम सुरू असलेल्या टेरेसवर मित्रांसोबत खेळताना शर्विल सागर महादेव (वय ९) याचा उच्च दाबाच्या वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागून मृत्यू झाला.

 

सायंकाळी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.

 

विद्युत वाहिनीला स्पर्श झाला आणि तो बेशुद्ध पडला. हा प्रकार लक्षात येताच त्याला कागल ग्रामीण रुग्णालयात नेण्‍यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शर्विलच्या मृत्यूची बातमी समजतात घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली. कुमार विद्यामंदिर सुळकूड शाळेत इयत्ता चौथीमध्ये तो शिकत होता. बोलका आणि मनमिळावू स्वभावाच्या शर्विलच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याची मोठी बहीण, आई-वडील, आजी-आजोबांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -