Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रकुत्रा चिरडल्याच्या रागातून रुग्णवाहिकेला अडवून चालकाला मारहाण; विलंबामुळे रुग्णाचा मृत्यू

कुत्रा चिरडल्याच्या रागातून रुग्णवाहिकेला अडवून चालकाला मारहाण; विलंबामुळे रुग्णाचा मृत्यू

अकोल्यात एक विचित्र घटना घडली आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेकडून कुत्र्याचा जीव गेला आणि वादाला तोंड फुटला. चालकाला मारहाण करण्यात आली आणि रुग्णवाहिकेत(ambulance)असेलल्या जखमी रुग्णाचा जीव गेला. ही घटना अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाट्यावर ही गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली.

 

जखमी कामगार मजुराला ॲम्बुलन्सने अकोल्यात घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेच्या चालकास मारहाण करण्यात आल्याने विलंब होऊन रुग्णवाहिकेतील(ambulance) जखमी रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र, या कुत्रामालकामुळेच रुग्णवाहिकेतील रुग्णाचा मृत्यू झाल्याच आरोपी नातेवाईकांना करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाट्यावरुन ॲम्बुलन्सने चोहोट्टा बाजार येथे एक कुत्रा मरण पावला. त्यामुळे, जखमी कुत्र्याच्या मालकाने ॲम्बुलन्स चालकाचा पाठलाग करत त्याला मारहाण केली. ॲम्बुलन्सचा पाठलाग करून दहीहंडा फाट्यावर ॲम्बुलन्स(ambulance) चालकाला पकडत कुत्रा मालाकाने जबर मारहाण केली. त्यामुळे, बराच वेळ रुग्णावाहिका घटनास्थळी थांबून राहिली, याशिवाय रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला.

 

यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जीव केला. जखमी कुत्र्याच्या मालकानेच ॲम्बुलन्स चालकाला ॲम्बुलन्स अकोल्याकडे घेऊन जाण्यासाठी अटकाव केला होता. ॲम्बुलन्स चालकाला मारहाण केलेल्या व्यक्तीमुळे रुग्णाचे प्राण गेल्याचा ॲम्बुलन्सचालक आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे.

 

तसेच, कुत्र्याच्या मालकावर कठोर कारवाईची मागणी देखील नातेवाईक आणि ॲम्बुलन्स चालकाने केली आहे. ॲम्बुलन्स चालकाला मारहाण करणारा व्यक्ती जागेवरून फरार झाला आहे.पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -