Thursday, June 26, 2025
Homeनोकरी१०वी पास तरुणांना मिळणार सरकारी नोकरी; PMPML मध्ये भरती सुरु, आजच करा...

१०वी पास तरुणांना मिळणार सरकारी नोकरी; PMPML मध्ये भरती सुरु, आजच करा अर्ज

सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड येथे भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. चालक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

PMPML मध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. वाहनचालक पदासाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी दहावी-बारावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच त्यांना ड्रायव्हिंगचा अनुभव असावा. याचसोबत ड्रायव्हिंग लायसन्सदेखील असावे.

 

या नोकरीसाठीची जाहिरात वृत्तपत्रात देण्यात आली होती. त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 744779 5958/9145001734/9168002179 या नंबरवर कॉल करा. या नोकरीबाबत अधिक चौकशीसाठी https://www.pmpml.org/ अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

पुणे परिवहन महामंडळातील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी जाताना तुम्ही काही आवश्यक कागदपत्रे घेऊन जायची आहेत.

 

आवश्यक कागदपत्रे

 

आधारकार्ड झेरॉक्स

 

ड्रायव्हिंग लायसन्स

 

शाळा सोडल्याचा दाखला

 

दहावी-बारावीचा प्रमाणपत्र

 

रहिवासी दाखला

 

पासपोर्ट साइज फोटो

 

पोलिस व्हेरिफिकेशन

 

मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट

 

पॅनकार्ड झेरॉक्स

 

बॅच क्रमांक

 

बँक कागदपत्रे

 

पत्त्याचा पुरावा

 

ट्रेनिंग सर्टिफिकेट

 

PMPML सारख्या सरकारी विभागात नोकरी तुम्हाला मिळणार आहे. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंगचा अनुभव असेल तर ही तुमच्यासाठी उत्तमसंधी आहे. नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. तुमचे काम पीएमपीएमलच्या बस चालवणे हे असणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -