पूर्ववैमनस्यातून लाथाबुक्क्यांनी व दगडांनी केलेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला. पृथ्वीराज विजय जाधव (वय २२ रा. शहापूर) असे जखमीचे नाव असून या प्रकरणी रविकांत चंद्रकांत घोलकर (वय ३२) व अमोल उर्फ रविंद्र शिवाजी कामते ( वय ३२ दोघे रा. आसरानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. अजय संजय भोसले (वय २२ रा. आसरानगर) याने गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती
अशी, मंगळवारी दुपारच्या सुमारास अजय याच्या डोक्यात व तोंडावर दगडाने मारून गंभीर भोसले, पृथ्वीराज जाधव
व राहुल होसमणी असे तिघेजण पाटील मळा ते शहापूर रोडवरुन मोटरसायकलीवरून निघाले होते. त्यावेळी असर नगर बसस्टॉप जव ळ थांबलेल्या रविकांत घोलकर व अमोल कामते या दोघांनी पूर्ववैमनस्यातून पृथ्वीराज याला शिवीगाळ करत रस्त्याकडेला असलेले दगड घेऊन त्यांच्यावर
अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर करताना.
फेकण्यास सुरुवात केली. तसेच पृथ्वीराज जखमी केले. जखमी पृथ्वीराज याला अजय भोसले हा दुचाकीवरून उपचारासाठी नेत असताना बिरदेव मंदिर परिसरात पुन्हा घोलकर व कामते यांनी मोटरसायकल अडवत पृथ्वीराज लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांवर बाला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. यातील अमोल कामते हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.