Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या

महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या

छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला किर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. सध्या महाराष्ट्रात आषाढी वारीचा(Ashadhi festival)उत्साह सुरू असताना महिला किर्तनकाराचा खून करण्यात आल्याच्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोड येथे असणाऱ्या मोहटादेवी आश्रमामध्ये(Ashadhi festival) राहणाऱ्या ह. भ. प. संगीताताई महाराज यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. आश्रमातच संगीताताई महाराज यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी कोण आहे. व ही हत्या का करण्यात आली, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येतोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -